जिल्हा परिषद अहमदनगर समाजकल्याण व महिला बालकल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

0
निघोज प्रतिनिधी (सागर आतकर)

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेली दोन वर्षात मोठय़ा प्रमाणात विकासकामे झाली असून निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद अहमदनगर समाजकल्याण व महिला बालकल्याण विभागाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप जिल्हा परिषद सदस्या श्रीमती पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा अण्णा वरखडे हे होते. या वेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. 


         यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती व भैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष नानासाहेब वरखडे,पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर,संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ , प्रगतीशील शेतकरी व सामाजिक अभ्यासक शिवाजीराव डेरे, कांदा व्यवसायीक भिमाशेठ घुले,विठ्ठलबुवा वरखडे,गवराम  लंके,कोंडाजीदादा वराळ,बाळासाहेब सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य भास्कर वराळ,मंगेश लाळगे,भीमराव लामखडे, दत्तात्रय गुंड,शितलताई वराळ,सुमनताई लोहकरे,माजी सदस्य व निघोज परिसर पञकार संघाचे अध्यक्ष संतोष ईधाटे, गजानन ठुबे,उद्योजक राजुशेठ लाळगे,दत्तात्रय घोगरे, भाजपचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष व अल्पसंख्याक समाजाचे नेते मनोहर राऊत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास हारदे,पैलवान सुभाष वराळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष निवृत्ती वरखडे,बबनराव गुंड ,शिवाजी लामखडे,बन्सी वरखडे,त्रिंबक वराळ,नामदेव डोकडे,भरत वराळ,बापू रासकर,संदीप गुरव,राहुल सोनवणे,संतोष वराळ,विनायक वराळ, नाभिक समाजाचे शहराध्यक्ष नाना राऊत,संदीप वरखडे, नाभिक समाजाचे नेते व अल्पसंख्याक समाजाचे नेते दत्ता राउत,किसन घोगरे,रघुनाथ लंके,बॉबीताई गायखे,मनोज ईधाटे,गंगाधर वरखडे,निलेश घोडे,आकाश वराळ,माऊली वरखडे,अविनाश वराळ,हर्षद ईधाटे,स्वप्नील आतकर,संजय बळीद,स्वप्नील दूनगुले,अबू तांबोळी,संदीप गवळी,रिकी सोनवणे,तुषार तांबे,बंटी लंके, बाबू लाळगे,ऋतिक वराळ,ओंकार दुनगुले,दिनेश ठुबे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वरखडे यांनी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई वराळ यांच्या कामाचे कौतुक केले गेली दोन वर्षात सर्वसामान्य गोरगरीब गरजूंचा आर्थिक विकास होण्यासाठी वराळ यांनी काम केले असून जनतेला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठय़ा योजनांचा लाभ मिळाला आहे. अशाप्रकारे येत्या तीन वर्षांत मोठय़ा प्रमाणात विकासकामे करण्याची संधी आपल्याला मिळणार असून संदीप पाटील फौंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांना सातत्याने पाठबळ देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे असे आवाहन वरखडे यांनी केले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई वराळ यांनी विकासकामांची माहिती दिली. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारप्रणालीने काम करीत आपण विकासकामांना गती देण्याचे काम केले आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांच्या नेतृत्वाखाली मोठय़ा प्रमाणात विकासकामे मार्गी लावली आहेत. सर्वसामान्य जनतेला फायदा कसा होईल यासाठी आपण सतत कार्यरत असल्याने आपले युवानेते सचिन पाटील वराळ यांच्या पाठपुराव्यामुळे कामांना मोठय़ा प्रमाणात गती मिळाली आहे. संदीप पाटील वराळ यांचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व कार्यरत असल्याची माहिती वराळ यांनी दिली आहे.  परिसरातील ग्रामस्थ यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश घोडे यांनी केले. गजानन ठुबे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top