वडनेर परीसरात बिबट्यांचा वावर नागरिक भयभीत--

0
निघोज प्रतिनिधी 
वडनेर बुद्रुक व वाजेवाडी(ता.पारनेर)येथिल परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासुन शेतकऱ्यांना दोन ते तीन बिबट्याचा वावर दिसत असल्यांने नागरीकामध्ये भितीचे वातावरण आहे.



            बिबट्याच्या हल्ल्यात गणपत येवले,रामभाऊ पवार,भिका येवले,रामदास मेचे,अनिल नर्है,नाना ठोंबरे यांची जनावरे दगावली आहे.वडनेर बुद्रुक हा नदीचा परिसर असल्यामुळे ऊसाचे क्षेञ जास्त असल्यामुळे बिबट्यांचा मुक्काम दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.शेजारील वाजेवाडीला ही बिबट्यांची दहशत आहे,यामुळे वडनेर बुद्रुक व वाजेवाडी परिसरात शेतीपंपाची विज दिवसा दयावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वडनेर बुद्रुक व वाजेवाडी ग्रामस्थांनी महावितरणाला दिला आहे.सबंधित मागणीचे निवेदन विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी व पारनेर महावितरणचे कनिष्ठ अभियंता गौरव चरडे यांना देण्यात आले आहे.
 पिंजरा आणुन लावण्यासाठी रमेश वाजे,संतोष वाजे,बाळु वाजे,ज्ञानेश्वर वाजे,दगडु बोचरे,दत्ता वाजे,विजय वाजे,रामदास वाजे,बाबाजी वाजे,गोरक्ष वाजे,बाळु  वाजे व इतर ग्रामस्थांनी  मदत केली.
   चौकट
वडनेर बुद्रुक व वाजेवाडी ग्रामस्थांनी रात्री शेतामध्ये जातानां टॉर्च बॅटरी,आगीचा डेंभा,मोठया आवाजाचे फडांगडे सोबत न्यावे.बिबट्याचा वावर दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क करावा.
    रंगनाथ वाघमारे .
   ( वनरक्षक पारनेर)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top