शेतकर्यांसाठी सदैव कष्ट करणार्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणार्या पोळा सणाचे महत्व जाणून घेऊ.
भारत कृषी प्राधान्य देश आहे आणि कृषीसाठी गुरांचे देखील आपले महत्त्व आहे. भारतात गुरांची देखील पूजा केली जाते.आणि पोळा सण त्यापैकी एक आहे. पोळा सण श्रावण अमावास्येला साजरा केला जातो. यादिवशी लोकं बैलांची पूजा करतात.
बैल पोळा या सणाविषयीची आख्यायिका :
जेव्हा प्रभू विष्णू कृष्णाच्या रुपात धरतीवर आले तेव्हापासून कृष्णाचा मामा कंस त्याचे प्राण घेऊ बघत असताना कंसाने अनेकदा कृष्णाचा वध करण्यासाठी असुर पाठवले. एकदा कंसाने पोलासुर नावाचा राक्षस पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध करुन सर्वांना हैराण केले होते तो दिवस अमावस्येचा होता. म्हणून या दिवसाला पोळा असे म्हणू लागले.
पोळा अमावस्याच्या दिवशी येत असून याला पिठोरी अमावस्या म्हणून देखील साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैल पोळाला मोठा पोळा आणि दुसर्या दिवशी तान्हा पोळा असे म्हटले जाते.
सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दिवस बैलाला पूजेचा मान देऊन नांगरापासून दूर ठेवले जाते.कोणत्याही प्रकारची शेतीची कामे बैलाकडून करून घेत नाहीत, या दिवशी बैलांना उटणे लावून मालीश करुन स्नान करवतात. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सजवलं जातं. त्यांना रंगबिरंगी वस्त्रांनी, दाग-दागिन्यांनी सजवण्यात येतं.
त्यांना पोळ्यांचा घास भरवला जातो,व त्याच्या विषयीची कृतज्ञता,प्रेम,आपुलकी,जिव्हाळा दर्शवला जातो.

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद