प्रातंविधीसाठी शेजारील डाळींबाच्या बागेत गेलेल्या एका वृद्ध महीलेवर बिबट्याने हल्ला केल्याने ही महीला जागीच ठार झाली. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथे आज (शनिवारी )पहाटे साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली.राधाबाई कारभारी वाजे (वय 70) असे या महिलेचे नाव असुन या घटनेने पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे...
याबाबत माहीती अशी की,वडनेर येथील
राधाबाई कारभारी वाजे या आज पहाटे ५.३० वाजता घरामागील डाळिंबाच्या बागेत प्रत:विधीसाठी गेल्या होत्या. त्याच वेळी बिबट्याने त्यांच्यावर झडप घालून घरापासून दूर ओढत नेले. बिबट्याच्या हल्ल्यात राधाबाई यांचे मुंडके व एक तळ पाय शरीरापासून दूर झाला असून त्यातच त्यांचा करून अंत झाला.या घटनेची माहीती समजताच पोलिस प्रशासन व वनविभागाचे आधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती.
पारनेर तालुक्यातील वडनेर, वाजेवाडी शिरापुर परीसरात गेल्या दोन तीन महिन्यापासुन बिबट्याचा वावर होता.तसेच या परीसरात अनेक जनावरांना या बिबट्याने भक्ष केले होते.
या बिबट्याला जेरबंद करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती .बिबट्याचा वावर वाढला असल्याने येथील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण असताना आज या बिबट्याने एका महिलेचा बळी घेतल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
दोनच दिवसांपूर्वी NEWS महाराष्ट्र दर्शनने बातमी प्रसिद्ध केईएलआय होती, मात्र बातमीची दखल घेतली न गेल्याने आज एका वृद्धेचा बळी गेला,यासाठी सर्वस्वी वन सौरक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी ग्रामस्थानमधून होत आहे.
चौकट
गेली आठ दिवसापासुन वडनेर व परिसरातील वाड्यावस्त्यावर तीन बिबट्यांचा वावर असल्याची तक्रार वडनेर ग्रामस्थ वनसंरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने करीत होते मात्र त्यांनी गावांत येउन टापा मारण्याचे काम केले प्रत्यक्षात बिबटे पकडण्यासाठी कोनत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही याला सर्वस्वी संबधीत खात्याचे अधिकारी जबाबदार आहे प्रथम त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद