महाराष्ट्रातील बँक कर्मचाऱ्यांची एकमेव संघटना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षते खालील को. ऑप. एम्प्लॉईज युनियनचे युनिट जीएस महानगर को ऑप बँक लि मुंबई आणि जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अँड उदयदादा शेळके आणि संचालक मंडळाने सांगली कोलापूर सोलापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला असून जीएस महानगर बँकेतील सर्व कर्मचारी वर्गांनी आपला एक दिवसाचा पगार रुपये ७,५८,५९९/- चा धनादेश युनियनचे अध्यक्ष मा. खा अडसूळ यांच्याकडे युनिटचे सचिव अशोक नवले,को ऑप बँक एम्प्लॉईज युनियनचे सयूंक्त चिटणीस सुरेश ठुबे व नारायण बोरुडे, संचालक शिवाजी खडांगळे, बाबाजी झावरे, गणेश रोकडे,संतोष गुंड, दीपक जाधव,चंद्रकांत मोटे ,रंगनाथ कवाद कचर निचीत संतोष लंघे सुभाष कदम आणि शांताराम झावरे यांनी सुपूर्त केला.
तसेच जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष मा अँड उदयदादा शेळके आणि सर्व संचालक मंडळ आणि जीएस महानगर बँक परिवाराच्या वतीने बँकेचे अध्यक्ष अँड उदय दादा शेळके,संचालक सुरेश ढोमे शेठ बाळा खणकर देडिया शेठ कांचन साहेब व मते साहेब यांनी पुरग्रस्थाना आर्थिक मदतीचा हात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे रुपये ११,००,०००/- चा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे. याबद्दल मा. खासदार आडसूळ यांनी जी एस महानगर बॅंकेला धन्यवाद दिले आहेत. बॅंकेने एकून अठरा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची मदत पुरग्रस्तांना केली असून गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्रावर कोनतीही आपत्ती आली तरी बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष स्व सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांनी वेळोवेळी मदत करण्याचे धोरण घेत सामाजिक काम केले आहे. तशाप्रकारे जी एस महानगर बॅंकेचे अध्यक्ष अॅड उदयदादा शेळके यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी सॉलिसिटर शेळके साहेब यांच्या विचारप्रणालीचे अनुकरण करीत सामाजिक व सेवाभावी उपक्रमाची परंपरा कायम ठेवली असुन आपली बॅंक जनतेची बॅंक हेच धोरण सहकार चळवळीला प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन मा. खा. आडसूळ यांनी व्यक्त केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद