श्री क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पिंपळनेर येथे श्री संताजी महाराज जगनाडे याच्या मंदिराच्या उभारणीसाठी पारनेर येथील कोंडीभाऊ त्रिंबक पतके व सौ सुमन कोंडीभाऊ पतके यांनी सांगितले की पिंपळनेर येथे एक गुंठा जागा खरेदी केली असून समाज बाधवाच्या सहभागातून मंदिर उभारणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
पारनेर तालुक्यातील हंगा येथे झालेल्या तिळवण तेली समाज अध्यक्ष व उपाध्यक्ष व कार्यकारणी निवड समिती निवडी निमित्ताने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ.नगर जिल्हा तिळवण तेली समाज दक्षिण नगर विभाग जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी समाजाला मार्गदर्शन करताना सांगितले.
पारनेर तालुक्याच्या वतीने जेष्ठ समाजबाधव चंद्रकांत काळे यांनी ज्ञानेश्वर राऊत याचा सत्कार केला.
पारनेर तालुका तिळवण तेली समाज अध्यक्ष रोहिदास काळे ,उपाध्यक्षपदी शिरीष शेलार (लोकमत पत्रकार जवळे)
महिला तालुकाध्यक्ष पदी कमल देशमाने उपाध्यक्ष पदी मनिषा घोडके (कान्हूर पठार ग्रामपंचायत सदस्य)याची निवड करण्यात आली.
ह.भ.प रामदास महाराज क्षीरसागर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य याचे अभिनंदन केले व समाज बाधवानी भेदभाव न करता समाजचे कार्य एकजुटीने काम केले पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद