पारनेर प्रतिनिधी-
गेल्या दोन तीन वर्षापासुन पाचविला पुजनेला दुष्काळ आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने पदरी आलेल्या नापिकीला कंटाळुन गारगुंडी( ता. पारनेर) येथील तरूण शेतकरी नितीन प्रकाश झावरे (वय-३८ ) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असुन पारनेर पोलिस ठाण्यात याबाबत खबर देण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, गारगुंडी(ता. पारनेर ) येथील शेतकरी नितीन झावरे हा आपल्या पत्नीसह राहत होता.येथील भास्कर झावरे व प्रशांत झावरे हे नेहमीप्रमाणे घराजवळ बसले असताना मयत नितीन याची पत्नी पुष्पा हीने या दोघांजवळ येवुन तुमचे भाऊ हे घराचे दार बंद करून घरात बसले आहेत तसेच दरवाजा उघडत नाहीत असे सांगितले असता हे तीघेही नितीनच्या घराजवळ गेले .त्यांनी मोठ्याने आवाज दिला मात्र काहीच आवाज येत नसल्याने गजाच्या सहाय्याने खिडकी उघडुन पाहीले असता पत्र्याच्या छताला नायलाँन दोरीच्या सहाय्याने नितीन गळफास घेवुन आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळुन आला.याबाबतची खबर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी जाऊन पोलीसांनी पंचनामा केला मृतदेह मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी टाकळी ढोकेश्वर येथील रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.सततच्या नापिकीतुन या शेतकर्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा याठिकाणी सुरु होती. पारनेर पोलिस पुढिल तपास करीत आहेत.
पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्यातील पठारभागात सातत्याने दुष्काळी परिस्थिती असलेल्या गारगुंडी गावात वास्तव्यास असलेले नितीन झावरे हे मागील वर्षीच्या दुष्काळ व या वर्षी वाटाण्याच्या पिकाचे झालेले नुकसान यामुळे आर्थिक अडचणीत आले असल्याचे बोलले जाते. नापिकीमुळे स्वप्नभंग झालेले नितीन निराश झाले व त्यातूनच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात असून पठार भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे दुःख आता तरी प्रशासनाने समजून घ्यावे असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद