पर्यावरण संतुलीत राहण्यासाठी व जलप्रदूषण टाळण्यासाठी निघोज येथे निघोज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद यांच्या पुढाकारातुन साकार करण्यात आलेल्या प्रदुषणमुक्त गणेश विसर्जनाला संकल्पनेला भक्तांनी अभुतपुर्व प्रतिसाद दिला.पारंपारीक पद्धतीने गणेश विसर्जन न करता निघोज नागरी पतसंस्थेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गावातील व परीसरातील गणेश भक्तांनी या उपक्रमात सहभागी होत गणरायाला निरोप दिला.
चालु वर्षी पारनेर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे .परिस्थिति दुष्काळी असल्याने वाडी -वस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी जनतेचे हाल होत आहे.पाण्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, म्हणुन निघोज येथील पतसंस्थेने नाविन्यपुर्ण उपक्रम केला .गणपतीची दहा दिवस मनोभावे सेवा पुजा केली जाते. त्या मुर्तिची विसर्जनानंतर काय अवस्था होत असेल अनेकदा हात तुटलेल्या, पाय तूटलेल्या मुर्ति पहावयास मिळते . तसेच त्या मुर्तिच्या विषारी रंगामुळे पाणी प्रदुषित होते आपण सर्व फळे, फुले पाण्यात टाकतो व पाणी दुषित होते . म्हणुन विसर्जन योग्य ठिकाणी करावे .पर्यावरण चांगले रहावे त्यासाठी निघोज नागरी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री . वसंतराव कवाद यांनी पुढाकार घेऊन घरगुती गणेश मुर्तिचे विसर्जन करण्याची जबाबदारी घेऊन कृत्रीम हौद आणुन त्यामध्ये मुर्तिचे विसर्जन करण्याची चांगली कल्पना साकारली . त्यामुळे पाण्याचे प्रदुषण टळले व पाण्याचा योग्य वापर झाला . यावेळी संस्थेचे सर्व संचालक , अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते .

या उपक्रमामुळे परिसरातून श्री .वसंत कवाद आणि निघोज संस्था परीवाराचे गणेश भक्तांमधुन व ग्रामस्थांमधून अभिनंदन होत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद