पारनेर प्रतिनिधी (सागर आतकर)
![]() |
पारनेर पोलिस स्टेशन मध्ये गणरायची स्थापना करण्यात आली होती. आगमनापासून बाप्पांची पोलिस बांधवांनी मनोभावे सेवा केली. त्यामुळे त्यांच्या मध्ये एक आनंद,उत्साह पाहायला मिळाला. आज पारनेर पोलिस स्टेशन मधून सकाळी १० वाजता गणरायची पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली.यावेळी पोलिस मित्रांनीही नाचून आनंद घेतला. उद्या होणार्या गणेश विसर्जन मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे. गणेश विसर्जनामध्ये मंडळांकडून कोणताही गैरप्रकार होणार नाही. याची काळजी सर्व गणेश मंडळांनी घ्यावी व गणेश विसर्जन हे आनंदमय वातावरणात पार पाडावे असे आवाहन पारनेरचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी केले.या गणपती विसर्जनासाठी तालुक्यातील सर्व पत्रकार,राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच,विविध संस्थांचे चेअरमन,संचालक,पोलिस मित्र ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणूक पार पडली.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद