निघोज नागरी पतसंस्थेचा उपक्रम... वाचा सविस्तर

1
पारनेर प्रतिनिधी (सागर आतकर)


                                
                                      संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पाला उद्या १२ सप्टेंबर रोजी आपण निरोप देणार आहोत. ढोल ताश्यांचा गजरामध्ये वाजतगाजत मिरवणूक काढणार आहोत. त्यांनतर आपण बाप्पांना पाण्यामध्ये विसर्जन करू व आपण पुन्हा आपल्या घरी निघून येऊ. मात्र आपण ज्या गणपती बापांना दहा दिवस मनोभावे त्यांची सेवा केली ते आल्यानंतर एक वेगळाच आनंदाचे वातावरण निर्माण झालं. त्याच बाप्पाना आपण विसर्जन केल्यानंतर मात्र विसरून जातो.आपण पुन्हा जिथे गणरायाचं विसर्जन केलं त्या ठिकाणी साधं पाहत पण नाही. त्या गणरायाचं काय झालं. विसर्जन केल्यानंतर काही दिवसांनी आपण त्याच आपल्या मूर्तीकडे पाहू शकतही नाही अशी अवस्था झालेली असते.यावर सर्व गणेश भक्तांनी विचार करावा अशी अपेक्षा करण्यात येते.                                                                         
                                             


                         याच विचाराने पारनेर तालुक्यातील निघोज येथील निघोज नागरी पतसंस्थेने घरगुती गणरायचे विसर्जनासाठी ४ फूट रुंद व ६ फूट लांब हौद तयार केले आहे.त्यामुळे इतरत्र गणरायाचे विसर्जन न करता गणरायाला चांगल्या पद्धतीने निरोप द्यायचा असेल तर या हौदमध्ये विसर्जन करावं जेणे करून मूर्ती वर लावलेले केमिकल चे रंग नदीत मिसळणार नाही व पर्यावणाला हानी पोहचणार नाही.गणरायाची विटंबना ही होणार नाही.म्हणून उद्या पतसंस्थेसमोर हौद ठेवण्यात येणार असून त्या हौदामध्ये घरगुती गणरायाचे विसर्जन करा व पर्यावरण सांभाळा असे आवाहन निघोज नागरी पतसंस्था व संस्थेचे चेअरमन वसंत बाबाजी  कवाद यांच्याकडून करण्यात येत आहे .
Tags

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

Google Ads 2




 

To Top