तालुक्यातील शाळा बंद ठेऊन शिक्षकांचा संपाला पाठिंबा

0
पारनेर तालुक्यातही शिक्षकांचा संप सुरू.तालुक्यातील जि.प शाळा बंद ठेऊन शिक्षकांचा संपाला पाठिंबा


शिक्षक व शिक्षकेतर तसेच, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी आज सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. यामुळे तालुक्यातील बहुतांश जि. प शाळा बंदच पाहायला मिळाल्या.सरकारने शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाची हाक शिक्षक संघटनांनी दिली आहे. संपाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारतीने पाठिंबा दिला आहे. यामुळे राज्यभरातील शाळा बंद राहणार आहेत.शिक्षकांच्या मागण्या मान्य होतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष असून मागण्या मान्य न झाल्यास विधानसभेच्या तोंडावर आंदोलन चिघळण्याचीही शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top