चित्रकलेतील ज्ञानेश्वराला आदर्श कलाध्यापक पुरस्कार

0
प्रतिनिधी (चंद्रकांत कदम)
      अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर चे नावाप्रमाणेच चित्रकलेतील ज्ञानेश्वर म्हणविले जाणारे कलाशिक्षक ज्ञानेश्वर रामदास कवडे यांना त्यांच्या शैक्षणिक कला क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी मुळे धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटी धुळे व डोम्स आर्ट मटेरियल मुंबई च्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाच्या पाश्र्वभूमीवर नाशिक विभागीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार धुळे शहराचे माजी आमदार तथा धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब कदमबांडे व ओंकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र निकम व डोम्स आर्ट मटेरियल प्रा.लि. मुंबईचे विशेष सल्लागार रघूनाथ पोवळे, धुळे  जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष राहूल पाटील यांच्या उपस्थितीत प्रा.आर.ओ. निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(पॉलिटेक्निक) कॉलेज गोंदूर, धुळे येथे शुक्रवार दि.६ सप्टेंबर २०१९ रोजी कवडे यांना प्रदान करण्यात आला.

       या सोहळ्यात धुळे कलाध्यापक वेलफेअर सोसायटीच्या वतीने धुळे,नाशिक, नंदूरबार, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील २६ गुणवंत कलाध्यापक बंधू- भगिनीना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व डोम्स आर्टमटेरियलच्या वतीने गिफ्ट हॅम्पर  देवून गौरविण्यात आले. यात क्रमांक एकने कवडे सरांची निवड करण्यात आली होती.
      कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. निकम यांनी कृतिशील कलाशिक्षक हे विद्यार्थी प्रिय शिक्षक व विद्यालयाचा आरसा असतात असे सांगितले त्याचबरोबर आनंदयायी शिक्षण प्रक्रियेत त्यांचे स्थान खूप महत्वाचे आहे तसेच विद्यार्थाची एकाग्रता, कल्पनाशक्ती, स्मरणशक्तीचा विकास होण्यासाठी कला विषय हा महत्वपूर्ण मानला जातो
        कवडे यांनी आपल्या शालेय कला अध्यापनाबरोबर फलकलेखन व अक्षरगणेश कलेतुन विविध स्तरावर आपला नावलौकिक केला आहे त्यामुळे त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
     पुरस्कार मिळाल्या बद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे साहेब, उपाध्यक्ष रामचंद्र दरे साहेब, सचिव जी.डी. खानदेशे साहेब , जेष्ठ विश्वस्त रामनाथ वाघ साहेब, पारनेर पं.स. सभापती राहूलभैय्या झावरे, अहमदनगर कलाध्यापक संघाचे संजय पठाडे सर, विद्यालयाचे प्राचार्य मुकुंद जासूद सर, उपप्राचार्य संजय कुसकर सर पर्यवेक्षक सुनिल वाव्हळ सर, समन्वयक बाळासाहेब करंजुले सर, क्रिडा शिक्षक बापूराव होळकर सर व सर्व कलाशिक्षक तसेच सर्व शिक्षक,पालकवर्ग यांनी अभिनंदन केले.त्यांच्या यशा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top