निघोज परिसरात बिबट्याची दहशत..चक्क पहाटेच्या सुमारास निघोज बसस्थानक परिसरात आढळला बिबट्या

1
निघोज प्रतिनिधी
निघोज व परिसरात बिबट्याचे वास्तव्य वाढले असून चक्क निघोज एस टी बसस्थानक परिसर तसेच कपिलेश्वर मंदिराजवळच्या पुष्पावती नदीजवळ बिबट्याने दर्शन दिल्याने जनतेत घबराट पसरली आहे. गेली दोन दिवसांपुर्वी साथी सर्पबहाद्दूर खटका यांनी बाजारतळ परिसरात बिबट्या पाहिला. 


तसेच शुक्रवार दि. 6 रोजी निघोजच्या एस टी बसस्थानक परिसरात ग्रामस्थांनी पहाटे साडेपाच वाजता बिबट्या पाहिल्याच ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गेली आठ दिवसापूर्वी वडनेर येथील वृद्धेला बिबट्याने ठार मारल्याची घटना घडल्यानंतर बिबट्या एक आहे की तीन आहेत शिवाय परिसरात बिबट्याची पिल्ले दिसल्याची माहिती उपलब्ध होत आहे. याचा तातडीने बंदोबस्त करण्याची गरज असून वनसंरक्षक विभागाने परिसरात पिंजऱ्यांची संख्या वाढवावी तसेच अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करावी.
चक्क बिबट्या निघोज गावात शिरला असून काही अघटित होण्यापूर्वी वनाधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात.अशी मागणी जनतेतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

  1. या सर्वांना माणूसच जबाबदार आहे कारण बेसुमार जंगलतोड।।।।

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा

Google Ads 2




 

To Top