कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना....

0
                         पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.संतोष सबाजी थोरात (वय ३८)असे या शेतकर्‍याच नाव असून पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील ते रहिवाशी होते.सततची नापिकी यामुळे संतोष थोरात अनेक दिवसापासून नैराशेत होते.शेतीमालला भांडवल म्हणून व घरखर्चासाठी थोरात यांनी पतसंस्थेचे कर्ज घेतले होते.आर्थिक विवंचनेतून त्यांनी शुक्रवारी विषारी औषध घेऊन आत्महतेचा प्रयत्न केला होता,त्यानंतर त्यांना उपचारासाठी पारनेर येथे नेण्यात आले.परंतु त्यापूर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी संगितले.शेतमालाला हमीभव न मिळाल्याने व सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे कुटुंबियांनी संगितले.त्यांच्या पश्चात पत्नी, लहान मुले, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top