बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

0
पुणे जिल्ह्यातील जांबुत (ता. शिरूर) येथील जोरी लवण वस्तीत रविवारी रात्री बिबट्याने दोन वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिला उचलून नेले. यानंतर तब्बल दोन तास शोधशोध करून या भागातील सर्व ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह शोधून काढला. या घटनेतील मृत्त मुलीचे नाव समृद्धी योगेश जोरी असे आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे पाटील, सरपंच दामुशेठ घोडे, डॉ. जयश्री जगताप यांच्यासह मोठया प्रमाणात ग्रामस्थ जमले होते.या घटनेला वन विभाग जबाबदार असून वेळोवेळी अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे परिसरात तीन ते चार लोकांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. तसेच वन खाते सामान्य लोकांना त्रास देणारे खाते झाले असल्याचे सांगत माजी आमदार पोपटराव गावडे आणि भिमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना आक्रमक होत बिबट्याचा बंदोबस्त करावा असे असं सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top