पारनेर: रामदास घावटे यांच्या बनावट तडिपारीच्या कारवाई प्रकरणी पोलिसांना नोटिसा....

0

  जवळे ता. पारनेर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास घावटे यांच्यावर पारनेर पोलिसांनी केलेल्या बनावट तडिपारीच्या कारवाई बाबत मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांकडे म्हणने मागविले आहे.घावटे यांच्यावर पाच महीण्यांपुर्वी केलेली तडीपारीची कारवाई वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ती लगेच मागे घेतली होती. त्यानंतर घावटे यांनी आपल्यावरील कारवाई पोलिसांनी सुड भावनेने केल्याची तक्रार पुराव्यांनिशी वरिष्ठांकडे केली होती., पुढे अनेक वेळा पाठपुरावा करूनही कोणीही दखल न घेतल्यामुळे या विषयीची तक्रार करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.त्यावर सुनावनी दरम्यान पोलिसांनी सहा आठवड्यांत या विषयीचे आपले म्हणने न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


रामदास घावटे यांच्यावरील कारवाई आकसातुन झाली होती का ?, असा प्रश्न येथे उपस्थित होतो कारण,पारनेर पोलिस ठाण्यातील सुशोभिकरणाचा पोलीसांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याने लगेचच त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिसांनी समोर आणला होता. याबाबतचे सर्व पुरावे आपण उच्च न्यायालयात सादर केल्याचे घावटे यांनी सांगितले.
लोकसेवकांनी बनावट पुराव्यांचा आधार घेवुन खोटा दोषारोप ठेवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.हा भा.द.वि.कलम २११ नुसार दखलपात्र गुन्हा असुन या प्रकरणातील दोषी पोलिसांवर तो नोंदला जावा अशी मागणी याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणात पारनेरचे तत्कालीन पोलीस निरिक्षक हणुमंत गाडे व बाजीराव पोवार यांनी अ ब क असे निनावी साक्षीदार गोपनिय अहवालात दाखवून या साक्षीदारांना प्रस्ताव पडताळणीवेळी जाणीपुर्वक गैरहजर ठेवल्याचा आरोप आहे.तर पोलिस उपअधिक्षक अरूण जगताप व सध्याचे गडचिरोलीला असलेले अप्पर पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी पडताळणीच्या अहवालात रामदास घावटे यांनी त्यांच्या बाजुने दिलेल्या साक्षीदारांचे नोंदवलेले जबाब व लेखी म्हणने जाणीवपुर्वक दडवल्याचा आरोप याचिकेत केलेला आहे. वरील पोलिस अधिकारी यांनी आपल्या लोकसेवक पदाचा गैरवापर करून एखाद्याला नाहक हाणी पोहचवण्याठी केला असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
याबाबत या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीचीही मागणी केली आहे.
या प्रकरणाची सुनावनी न्यायमुर्ती टी.व्ही. नलावडे, न्या. ए.व्ही. अवचट यांचे खंडपीठासमोर चालु असुन याचिकर्त्यांच्या बाजुने अॅड. चैतन्य धारूरकर तर सरकार पक्षाचे वतीने अॅड. ए.आर. काळे काम पाहत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top