समाजातील दानशूर व्यक्तींना एक विनंती ही बातमी नक्की वाचा व सहकार्य करा

0
फाकटे गाव( रामनगर) (ता शिरूर ,जिल्हा- पुणे) येथील रेकाँर्ड डान्स स्पर्धेचे
आयोजक गणेश कडूसकर यांच्या दिड वर्षाच्या मुलीला किडनीचा कँन्सरचा आजार बळावला आहे.  ही चिमुकली सध्या पुण्यात भारती हाँस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तिच्या उपचारासाठी सुमारे पाच लाख रुपयाची गरज आहे.मात्र मुलीचे पालक गणेश कडुसकर यांची हलाखीची परीस्थिती असल्याने या चिमुकलीच्या उपचारासाठी मदतीची आवश्यकता आहे. यासाठी वल्ड आँफ डान्स ग्रुपचा  पुढाकार घेतला आहे.एक हात मदतीचा या उपक्रमातुन समाजातील दानशुर व्यक्तींनी या चिमुकलीला मदतीचा हात द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

      फाकटे येथील गणेश कडुसकर यांची दिड वर्षाची मुलगी कु .श्रुतिका गणेश कडुसकर हिच्या एका किडनी वर एक गाठ आली होती ,ती गाठ काढण्या साठी तिची एक किडनी काढावी लागली त्या साठी अंदाजे खर्च 2.5 लाख रुपये आला,ती गाठ तपासणी साठी दिली असता ,ती कॅन्सर ची निघाली ,तेव्हा तिला पुढील उपचारासाठी खर्च अंदाजे 5  लाख रुपये लागणार आहे , हे उपचार पुणे येथे भारती हॉस्पिटलमध्ये चालू आहे,तरी गणेश कडूसकर यांची परिस्थिती हलाखीची असून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी वल्ड आँफ डान्स या ग्रुपने पुढाकार घेत एक हात मदतीचा हा उपक्रम हाती घेतला आहे.
 पुणे व नगर जिल्ह्यातील रेकाँर्ड डान्स स्पर्धेतील कलाकारांनी यासाठी मदतीचा हात द्या असे आवाहन समाजातील दानशुर व्यक्ती व सामाजिक संघटनांना केले आहे.
 या चिमुकलीला मदत करण्यासाठी खालील बँक खात्यात मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नाव - कु.श्रुतिका गणेश कडुसकर
श्री.गणेश बाबुराव कडुसकर
गाव फाकटे (रामनगर)
तालुका.शिरूर
जिल्हा.पुणे
पिन नंबर 410504
बँक ऑफ महाराष्ट्र
शाका - हाजी टाकळी
बँक खाते क्रमांक - 60188605380
Ifsc code - MAHB0000837
MICR code - 412014016
Mobile - 9503339866.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top