न्यु आर्टस्,कॉमर्स आणि सायन्स कॉलेज पारनेर छात्र सेनेच्या कॅडेट्स यांनी महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

0
दि. 02/ पारनेर प्रतिनिधी / रवी कावरे
न्यु आर्टस्,कॉमर्स आणि सायन्स कॉलेज पारनेर छात्र सेनेच्या कॅडेट्स यांनी महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.


पारनेर नगरपंचायत व न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर बाजारतळ व एसटी स्टँड इत्यादी ठिकाणी स्वच्छता करून नागरिकांना प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती केली.पारनेर शहरातील नागरिक व राष्ट्रीय सेना यांनी प्लास्टिक बंदीची शपथ घेतली.शपथविधीच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर,उपप्राचार्य डॉ.दिलीप ठुबे,लेफ्टनंट प्राध्यापक भरत डगळे,सुनील चव्हाण,संजय कोल्हे व पारनेर महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद,पारनेर नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ.सूनिता कुमावत,कार्यालयीन अधिक्षक अंबादास मेरगु,स्वच्छता अभियंता सचिन राजभोज व राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स अनिकेत काणे, ऋषिकेश कासोटे,दिक्षा जाधव,मजीद शेख,किरण ठुबे,पारनेर नगर पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top