पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी आज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पारनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जास्त डामडोल न करता उमेदवारी अर्ज दाखल केला.
यासाठी पारनेर नगर तालुक्यातील पक्षाचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी निलेश लंके यांनी येणाऱ्या काळात पारनेर तालुक्यात बदल होणार आहे व जनतेचा असणारा पाणीप्रश्न,रोजगार,आरोग्य,शिक्षण सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे,बबलू रोखले, संभाजी रोहोकले, नगर तालुक्याचे तालुका अध्यक्ष दुसुंगे,उदय शेळके,पारनेर बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड,अशोक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद