पारनेर तालुक्यातील काळु नदीपात्रातुन अवैध वाळु उपसा होत असल्याची माहिती पारनेरचे पोलिस निरीक्षक आर.डी.गवळी यांच्यासह डी.बी.पथकाचे पो.काॅ शिवाजी कवडे,विनायक बोरगे,पो.काॅ कदम यांच्या पथकाला सोमवारी पहाटे समजली होती.
त्यानुसार ढवळपुरी फाट्यावर दोन डंपरवर पारनेर पोलिसांनी कारवाई केली असुन एक चालक ताब्यात घेतला आहे. तर अक्षय शिंगवे ( पुर्ण नाव नाही ) राहणार – नांदगाव शिंगवे ता- नगर हा फरार झाला आहे. दुसरा डंपरवरील कुशाबा संभाजी चौगुले वय – २३ राहणार- नांदगाव शिंगवे ता- नगर यांच्यासह ताब्यातील ड॔पर क्रमांक एम.एच.९९०० ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरा डंपर क्रमांक एम.एच.१६ सीसी ४५१८ हा ताब्यात घेतला असुन चालक फरार झाला आहे.
पोलिस काॅन्स्टेबल शिवाजी कवडे यांच्या फिर्यादिनुसार दोन डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एक डंपरवरील चालक फरार झाला आहे. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन २२ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त करून ८ ब्रास वाळु जप्त करण्यात आली आहे.
यासबंधी पोलिस सूत्रांकडून समजलेले माहिती अशी की अशी की विधानसभा निवडणुक निमित्ताने फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवत असताना ढवळपुरी परिसरात अवैध वाळु उपसा करून वाहतुक करत असलेले दोन डंपर येत आहे. अशी माहिती मिळाली ,त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस.निरीक्षक राजेंद्र गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्सेबल शिवाजी कवडे करत आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद