कोहकडी येथे गावठी हातभट्टीवर पारनेर डी.बी पथकाची कारवाई

0
दि.26
पारनेर तालुक्यातील कोहोकाडी येथे गावठी हातभट्टी उध्वस्त करण्यात आली.यावेळी दोन जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(फ).(ड).(ई).प्रमाणे कारवाई करण्यात आली.पारनेरच्या डी.बी.पथकाने ही कारवाई केली.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र भेटीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोहकडी येथील गावठी हातभट्टीवर कारवाई करण्यात आली.पोलिसांनी छापा टाकताच दारुभट्टी मालकांनी शेजारी असलेल्या नदीच्या चिखलाचा व पाण्याचा फायदा घेत पोहत जाऊन पोबारा केला.यावेळी पारनेर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

कारवाई करताना पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी,पो.कॉन्स. भालचंद्र दिवटे,पो. कॉन्स.शिवाजी कावडे

याबाबत पोलिससूत्रांकडून समजलेली माहीती अशी, विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्र भेटीचे काम चालु असताना पारनेरचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना कोहकडी शिवारात अवैध दारूभट्टी सुरू असल्याची खबर मिळाली. ही खबर मिळताच पोलिस उपअधिक्षक अजीत पाटील यांच्या मार्गदर्शन खाली पोलिस निरीक्षक राजेश गवळी,पोना.विनोद बोरगे,पो.कॉ .महेश आव्हाड ,पो.काँ. शिवाजी कावडे,पो.कॉ भालचंद्र दिवटे आदीच्या पथकाकडुन कोहकडी येथे छापा टाकुन 600 लिटर कच्चे रसायन रक्कम रुपये 18000 व 180 लिटर तयार दारू रक्कम रुपये 9000 रुपये किमतीची तयार हातभट्टी दारू तसेच 5 हजार रुपये किमतीचे दारूभट्टी काढण्याची साधने असा एकूण 32000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

त्या वस्तूंचा जागीच नाश करण्यात आला.तसेच दारू तयार करणे साधने कच्चे रसायन व तयार दारू जागीच नष्ट करण्यात आली आहे.


यावेळी या दारुभट्टीचे मालक सागर महादू गव्हाणे व महादू कत्तीमल गव्हाणे दोघे राहणार खिलारी वस्ती 5 नंबर चारी कोहकडी शिवार कोहकडी तालुका पारनेर हे दोघे पोलिसांची चाहूल लागताच नदीच्या कडेने असलेल्या चिखलाचा व पाण्याचा फायदा घेऊन पोहत जाऊन फरार झाले.शिवाजी कावडे यांच्या फिर्यादीवरुन पारनेर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top