मळगंगा पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

0
पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली ही सभा संस्थेच्या सभागृहात चेअरमन प्रभाकर कवाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या संस्थेचे उपाध्यक्ष रामदास लंके व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप वराळ उपस्थित होते. 


संस्थेचे चेअरमन प्रभाकर कवाद यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेने नगर,पुणे जिल्ह्यात तसेच मुंबई उपनगर शहरात सर्वसामान्य जनतेला आर्थिक विकासासाठी मोठे पाठबळ दिले आहे. या अहवाल वर्षात 41 कोटीपेक्षा जास्त ठेवी,चोवीस कोटींचे कर्जवाटप,11 कोटी 31 लाखांची गुंतवणूक,दहा लाख रुपये नफा,ऑडिट वर्ग "अ" अशी प्रगती केली असून, या संस्थेच्या पारनेर तालुक्यातील निघोज, देवीभोयरे,आळकुटी, पिंपरि जलसेन, जवळा, मुंबईतील कुलाबा,कामोठे, पुणे जिल्ह्यातील कवठे यमाई, कारेगाव या सर्व शाखा प्रगतीपथावर नेल्या आहेत.यावेळी बाळासाहेब लामखडे नामदेव पठारे,मच्छिंद्र लंके,रामदास रसाळ,शंकर वराळ,वसंत बुचडे,रमेश वरखडे,सोमनाथ वरखडे,राजेंद्र लाळगे,भास्कर शेळके,लहुजी वागदरे, संतोष येवले,संजय सोनवणे,अविनाश भांबरे,सदाशिव घोडे,शंकर भुकन व संस्थेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top