महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर

0
      ज्या घोषणेची सर्वजण वाट पाहत होते त्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर आहे.यंदाची निवडणूकही एकाच टप्यात होणार असून 21 ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान घेण्यात येणार आहे.

      3 दिवसांनंतर म्हणजेच 24 ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.दिवाळी आधीच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याने नेमके विजयाचे फटाके कोण फोडणार व फुसका बार कोण काढणार हे पाहणं सर्वांच्या उत्सुकतेच असणार आहे.

अखेर आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९

▶️अधिसूचना जारी करण्याची तारीख - 27 सप्टेंबर 2019

▶️नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख - 4 ऑक्टोबर 2019

▶️ अर्जाची छाननी - 5 ऑक्टोबर 2019

▶️ अर्ज मागे घेण्याची तारीख - 7 ऑक्टोबर 2019

💠 मतदान - सोमवार 21 ऑक्टोबर 2019

💠 मतमोजणी - गुरुवार 24 ऑक्टोबर 2019

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top