पारनेर प्रतिनिधी (सागर आतकर)
पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयाचे प्रा.मनोहर एरंडे यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी प्राप्त झाली.त्यांनी मानव विद्या शाखेअंर्तगत "अग्रिकल्चर लँड युज इन अहमदनगर डिस्टीक" या विषयावर विद्यापीठास प्रबंध सादर केला होता.यासाठी त्यांना जयक्रांती महाविद्यालय लातूर येथील डॉ. राजेश्वर खाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी डॉ.एरंडे यांनी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर येथील भूगोल विभागातील संशोधन केंद्रातून पुर्ण केले.
![]() |
अभिनंदन करताना जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य सहदेव आहेर सर |
प्रा.मनोहर एरंडे यांना पीएच् डी. पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर उपस्थित होते.
यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, तसेच सोनिया एरंडे, सुरज एरंडे, शरयु एरंडे, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ घोगरे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद