(NEWS महाराष्ट्र दर्शन प्रतिनिधी शुभांगी डोमे )
दि.१९/०१/२०२०
निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालय व साविञीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आई माझ्या महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच प्रा.अनुजा भांबरे यांच्या सहकार्यांनी व विद्यार्थ्यांनी बसवलेल्या आई माझी मायेची सावली या स्वागत गिताने झाली.हा कार्यक्रम पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत तसेच विद्यार्थी,शिक्षक यांच्या मातेच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर होते.
मुलीला चांगले शिक्षण देण्याची जबाबदारी मातेची आहे ,मुलाइतका मुलीवरही विश्वास ठेऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरीत करावे. एक मुलगी शिकली तर संपुर्ण कुटुंब सुशिक्षित होते असे मत पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी व्यक्त केले.मुलींचे व आईंचे मैञीचे नाते असावे आई ही मुलींची पहिली गुरू असते. आजच्या युगात सर्वच श्रेञात मुलींचे वर्चस्व असून मुलामुलीमध्ये होणारा भेदभाव चिंताजनक असून माता पित्यांनी मुला मुलींना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त करून द्यावी. मुलांना मोठे व्हायचे असेल तर आपण आपल्या पायाकडे पाहीले तर यश मिळते याबद्दल अनेक उदाहरणे त्यांनी दिले तसेच आईविषयी कविता व "मी गर्भातील मुलगी बोलतेय" हा एकपाञी प्रयोग त्यांनी सादर केला.मुलींना स्वप्नाचे पंख घेऊन उडू द्या असे आव्हान मातांना केले. तसेच महाविद्यालयात राबवल्या जाणा-या नवनवीन उपक्रमाबद्धल व या आगळ्या वेगळ्या कार्याबद्धल प्राचार्य डॉ. सहदेव आहेर व सर्व प्राध्यापकांचे त्यांनी कौतुक केले.यावेळी पारनेर पञकार संघाचे अध्यक्ष विनोद गोळे यांनी सांगितले की मुलिकादेवी महाविद्यालय हे उपक्रमशील महाविद्यालय असून या महाविद्यालयात नेहमी नाविण्यपुर्ण कार्यक्रम होत असतात.
भविष्यासाठी मुलींनी महाविद्यालयीन शिक्षण घेणे उपयोगी असून आपल्या मुलींचे चांगले भवितव्य घडवण्याची प्रेरणा उपस्थित असलेल्या सर्व मातांना मिळावी तसेच आपल्या मुलींचे चांगले भवितव्य घडवण्याची प्रेरणा उपस्थित असलेल्या सर्व मातांना मिळावी तसेच आपली मुलगी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेते ते महाविद्यालय कसे आहे तेथे कोणते उपक्रम राबविले जातात मुलीचे शिक्षणातील कृतत्व काय आहे याचा परिचय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.असे प्रा डॉ.सहदेव आहेर आपल्या अध्यक्षीय भाषणातून आपलं व्यक्त केल.
याप्रसंगी प्राचार्यांच्या आई सुभाबाई आहेर व बहिन मिराताई आहेर तसेच नर्मदा जगदाळे, सुशिला गोर्डे, गंगुबाई लाळगे, बायशाबाई ढवन, संगिता लंके, पवार,सिमा डोमे, चातुरा साळवे, लता लंघे, कांताबाई रसाळ, संगिता वाजे,आशा निकाळजे या मातांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रा. दिपाली जगदाळे व प्रा.केशर झावरे, प्रा.मनिषा गाडिलकर यांनी प्राध्यापकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले याचबरोबर कु. कोमल पवार, कु.श्रद्धा धवन, कु. पुजा लंके, कु. दिप्ती भामरे, कु.दामिनी साळवे, कु.शुभांगी डोमे,कु.एश्वर्या भंडारी, कु.कविता रसाळ,कु. निकिता निकाळजे,कु. दिपाली वाव्हळ,कु. मोहिनी शेळके, कु.सिमा साळवे,कु. मोहिनी वाजे,कु. माधुरी बेलोटे या विद्यार्थीनींनी आपल्या आईबद्धल कृतज्ञता व्यक्त केली व आईंचे जिवनातील महत्त्व सांगितले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनींच्या मातानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.२५० पेक्षा जास्त माता या कार्यक्रमास उपस्थित होत्या.मुलगी ते आई हा प्रवास सांगताना अनेक मातांचा कंठ दाटून आला .आपल्या मुलीच्या शिक्षणातील कृतत्व व सन्मान पाहून मुलीबरोबर महाविद्यालयात उपस्थित असलेल्या मातांच्या डोळ्यात आनंदअश्रू तरळले. कष्ट करून मुलीला चांगले शिकविण्यासाठी धडपडणा-या आईने महाविद्यालयात पाऊल टाकताच मुलींनी सर्वांचे केलेले स्वागत त्यांना आनंद देणारे ठरले.
माझी मुलगी देशाची सेवा करणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करीत या मातांनी. यांच्याबद्धलही कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी तलाठी भाउसाहेब निंबाळकर, भास्कर कवाद, बाबाजी बोचरे, आनंदा भुकन,दता गाडगे,उपप्राचार्य डॉ.मनोहर एरंडे, महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी व माता मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे छायाचिञन निलेश पवार व दिघेश पवार तर कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक संयोजक प्रा. मनिषा गाडिलकर यांनी केले.सुञसंचालन प्रा.प्रतिभा शेळके, प्रा.सोनाली बेलोटे यांनी तर आभार प्रा.अंजली मेहेर यांनी मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद