निघोज प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री.मुलिकादेवी महाविद्यालय निघोज येथे आचार्य बाळशास्ञी जांभेकर जयंती निमित्ताने पञकारांचा सन्मान केला.
पञकारांचे समाजासाठी मोठे योगदान असून समाज बदलण्याची व लोकशाही बळकट करण्याची ताकत पञकारामध्ये आहे.पञकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असे मत अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त राहुल झावरे यांनी व्यक्त केले.श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज येथे आचार्य बाळशास्ञी जांभेकर जयंती निमित्ताने पञकार दिनाचे आयोजन करण्यात आले तेंव्हा अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पञकार भागाजी वरखडे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, उपप्राचार्य डॉ मनोहर एरंडे, प्रसिद्धी समितीचे चेअरमन डॉ.गोविंद देशमुख,प्रा.प्रविण जाधव, प्रा.सचिन लंके, निघोज परिसर पञकार संघाचे अध्यक्ष संतोष ईधाटे, दताजी उनवणे, अनिल चौधरी,सतीश रासकर, दत्तात्रय गाडगे, भगवान श्रीमंदीलकर, बाबाजी वाघमारे, सागर आतकर, संदीप गाडे, आनंदा भुकन, विजय रासकर, एकनाथ भालेकर, शोभाताई वरखडे, प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.महाविद्यालयाच्या वतीने सर्व पञकारांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन बाळशास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले,तसेच प्रसिद्धी काञण फाईलचेही यावेळी प्रकाशन केले.
राहुल झावरे म्हणाले की विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्न उपस्थित केले पाहिजे.जगाचे प्रश्न स्वताच्या मनात पेरले पाहिजे शिक्षणाचा चिंतन करून वापर केला तर प्रत्येक माणुस पञकार तयार होईल असे सांगितले.
यावेळी भागाजी वरखडे यांनी "आजची पञकारिता व पञकारितेचे उद्याचे भवितव्य" या विषयावर बोलताना म्हणाले की पञकारितेत अचुकता, संदर्भ व सजगता महत्वाची आहे.ज्ञानाचे आदान प्रदान पञकाराने समाजाशी करावे तसेच विद्यार्थ्यांनी अग्रलेख वाचन केल्यास बौद्धिक क्षमता वाढते असे सखोल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. सहदेव आहेर म्हणाले की निघोज पञकार संघाचा नावलौकिक असून महाविद्यालय स्थापनेपासून महाविद्यालयाचा आलेख वाढवण्यात परिसरातील पञकारांचे खुप मोठे योगदान आहे.यावेळी दत्तात्रय गाडगे,भगवान श्रीमंदीलकर,दताजी उनवणे यांनीही पञकारिता विषयावर आपले मत मांडले.कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.आनंद पाटेकर व दिपाली जगदाळे यांनी केले तर आभार डॉ. गोविंद देशमुख यांनी मांडले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद