थाळनेर येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस साजरा

0
धुळे : थाळनेर 
धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात आला.महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस 2 जानेवारी रोजी असून त्यानिमित्ताने पोलिस महासंचालक कार्यालय मुंबई यांचे पत्रान्वये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 02 जानेवारी ते 08 जानेवारी 2020 हा आठवडा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना तसेच महिला व जेष्ठ नागरिक यांना पोलिस दलाबद्दल माहिती देऊन त्यांना पोलिसांचे कार्य समजावून सांगण्यात आले.तसेच विविध कायद्यांची माहिती देऊन तसेच निबंध स्पर्धाचे आयोजित करून त्याबाबत अभिप्राय घ्यावा असे अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालय धुळे यांचेमार्फत प्राप्त झाल्यानंतर थाळनेर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पोनि.श्री.सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ पोलीस हवालदार माळी,पोलीस कॉन्स्टेबल सीराज खाटीक,पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पावरा,महिला पोलीस कॉन्स्टेबल आरती दिवेकर या पथकाने थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या आठवड्याच्या कालावधीमध्ये विविध शाळा व कॉलेजांना भेटी देऊन त्यांना पोलिस दलाच्या कामकाजाबद्दल तसेच पोलिस दलाच्या शस्त्राबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर मुकबधिर शाळेत शिक्षण घेत असणार्‍या विद्यार्थ्यांना बिस्कीट पुडे वाटप करून पोलीस स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top