श्री मुलिकादेवी महाविद्यालयात मुलिकादेवी महाविद्यालय व निघोज परिसर पञकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे आयोजन

0
निघोज दि. 9 जानेवारी
पत्रकार दिनाच्या निमित्ताने निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालयात निघोज परिसर पञकार संघ व मुलिकादेवी महाविद्यालयातील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने बुधवार दि. 9 रोजी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार दत्ता उनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी उपप्राचार्य डॉ मनोहर एरंडे, निघोज परिसर पञकार संघाचे अध्यक्ष संतोष ईधाटे,न्यूज महाराष्ट्र दर्शनचे संपादक व पारनेर तालुका इलेक्ट्रॉनिक मिडीया संघाचे खजिनदार सागर आतकर,अनिल चौधरी,शिरीष शेलार,भास्कर कवाद,दत्तात्रय गाडगे,संदीप गाडे,आनंदा भुकन,प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.यावेळी उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दत्ता उनवणे म्हणाले की, कवी काव्यातून व्यक्त होतात तर पञकार लेखणीतून व्यक्त होतात. लेखणीद्वारे कवी,लेखक व पञकार समाज जीवनाचं चरीञ चिञण मांडतात.त्यामुळे प्रत्येकाने लेखन करणे गरजेचे आहे.
निघोज परिसरातील पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हे पहिले काव्य संमेलन असून अशी संमेलने ग्रामीण भागात आयोजित केली पाहिजेत.यावेळी प्राचार्य डॉ.सहदेव आहेर म्हणाले की काव्य संमेलन ही काळाची गरज आहे, काव्यरुप वैचारीक ठेवा समाजास दिशादर्शक आहे. कवी हा समाजमनाचा आरसा आहे तो सदैव तेवत राहीला तरच समाजाची जडणघडण योग्य दिशेने होते. 
काव्य  संमेलनाचे आयोजनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार दत्ता उनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सहदेव आहेर तसेच मान्यवर  (छायाचित्र :जयसिंग हरेल) 

बेधडक महाराष्ट्र आयोजित काव्य संमेलनात डॉ संजय बोरूडे, शांताराम खामकर, कारभारी बाबर, स्वाती ठुबे - खोडदे, गितांजली वाबळे, संजय( देवा) ओहोळ आदी कवी उपस्थित होते. या काव्य संमेलनाचे सुत्रसंचालन कवी - लेखक - चित्रपट गितकार प्रा.अरुण वाळुंज यांनी केले.यावेळी प्रा.आनंद पाटेकर,प्रा.प्रविण जाधव,शुभम गरूड,मनिषा मुळे यांनीही कविता सादरीकरण केले.या काव्य संमेलनाचे सुञसंचालन प्रा.आनंद पाटेकर तर आभार प्रा.प्रविण जाधव यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top