गावठी हातभट्टीचा दारुअड्डा छापा टाकून उद्ध्वस्त

0
धुळे : थाळनेर शिवारात तापी नदीच्या किनारी सुरु असलेला गावठी हातभट्टीचा दारुअड्डा पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला.सत्तावीस हजार दोनशे सत्तर रुपयांची दारुसाठी नायनाटही करण्यात आला असून एका तरुणाला अटक केली आहे़.

शिरपूर तालुक्यातील थाळनेर शिवारात तापी नदीच्या किनारी एकनाथ जमादार यांच्या शेतापासून काही अंतरावर सार्वजनिक जागी झाडा-झुडूपांमध्ये गावठी हातभट्टीची दारु गाळली जात असल्याची माहिती थाळनेर पोलिसांना मिळाली माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ,पोलीस कर्मचारी विजय जाधव, प्रकाश मालचे, सिराज खाटीक, सरला जाधव, होमगार्ड मुकेश कोळी,आकाश सूर्यवंशी,अमोल ढिवरे यांच्या पथकाने सापळा रचला.माहिती मिळालेल्या ठिकाणी शिताफिने जावून छापा टाकण्यात आला.झाडा-झुडूपांमध्ये प्लॅस्टिकचे ड्रम ठेवलेले होते.एक जण चार दगडांनी मांडलेल्या चुलीजवळ बसलेला होता.चुलीवर कच्चे रसायनाने भरलेले पत्रटी ड्रम, त्यावर मातीच्या भांड्यामध्ये स्टीलची प्लेट,प्लेटला स्टीलची नळी जोडलेली त्यावर जर्मनी पातेले मांडलेले होते.मातीच्या भांड्यास दारु गाळण्यासाठी मध्यभागी स्टीलच्या प्लेटला लावलेल्या नळीद्वारे दारु प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये गाळली जात असताना पोलिसांनी छापा टाकला.
पोलिसांनी सर्व साहित्य मिळून २७ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत त्याची जागेवरच विल्हेवाटही लावली.याप्रकरणी संशयित राजेंद्र हरचंद शिरसाठ (३५,रा.पूरग्रस्त कॉलनी,थाळनेर ता. शिरपूर) या तरुणाला अटक करण्यात आली.प्रकाश मालचे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top