श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांची ३९६ वी जयंती जवळे तिळवण तेली समाज्याच्या वतीने साजरी

0
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील ग्रामपंचात कार्यालयात तिळवण तेली समाजाचे व वारकरी संप्रदायाचे भूषण म्हणून ओळखले जाणारे श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांची ३९६ वी जयंती जवळे तिळवण तेली समाज्याच्या वतीने साजरी करण्यात आली.
संताजी तेली बहू प्रेमळ / अभंग लिहित बसे जवळ धन्य त्याचे सबळ संत जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या चौदा टाळकर्या  पैकी एक संताजी महाराज जगनाडे यांची वारकरी संप्रदायात ओळख आहे.


तुकाराम महाराज यांची गाथा आज ही पाहण्यास मिळत ती संताजी महाराज यांच्या मुळे तुकाराम महाराज यांची कीर्तने प्रवचने चे संताजी महाराज यांनी वृताकांन लेखन केलेले असल्याने जीवंत आहे.
संताजी महाराज जगनाडे याचे जन्मगाव हे पुणे जिल्ह्यातील चाकण आहे सन २०१८ मध्ये मध्ये शासनाने  राष्ट्रीय संत घोषित करून  ८ डिसेंबर २०१९पासून शासकीय निमशासकीय व शाळा कॉलेजात ही जयंती साजरी करण्यात यावी,म्हणून आदेश जारी केले म्हणून आज जयंती साजरी होत आहे असे पारनेर तालुका तिळवण तेली समाज उपाध्यक्ष शिरीष शेलार यांनी सांगितले.
यावेळी जवळे गावचे माजी सरपंच शिवाजीराव सालके भाजप जिल्हा सरचिटणीस कृष्णाजी बडवे किसन आढाव जालिंधर सालके  पारनेर तालुका तिळवण तेली समाज उपाध्यक्ष शिरीष शेलार जेष्ठ समाज बाधव मदनशेठ रत्नपारखी भाऊसाहेब शेलार कैलास शेलार विनायक शेलार सुभाष शेलार बबन शेलार  राजेंद्र शेलार संदेश शेलार मधुकर लोखंडे संदिप शेलार अभिषेक शेलार तन्मय आंबेकर
 समाज बाधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top