पारनेर प्रतिनिधी (सागर आतकर)
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी-सुतारवाडी परिसरात अतिवृष्टी मुळे धनगर बांधवांचा परंपरागत असणारा मेंढपाळ व्यवसाय अडचणीत आला आहे.
ढवळपुरी-सुतारवाडी परिसरात सततच्या पडणाऱ्या अतिवृष्टी मुळे मेंढ्याना खरकूत रोगाची लागण होऊन सुमारे ५०० ते ६०० मेंढ्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
आज पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार लोकनेते निलेश लंके साहेब यांनी आज प्रत्यक्ष ढवळपुरी-सुतारवाडी येथील तांड्यावर जाऊन परिस्थितीची पहाणी करून तहसीलदार मॅडम सौ.ज्योती देवरे,जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.तुंबरे,तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.शिंदे यांना सांगितले की माझ्या या धनगर बांधवाना लवकरात लवकर सर्वोतोपरी मदत उपलब्ध करून त्यांच मेंढपाळ हे पशुधन या संकटातून कसे बाहेर येईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे.
तसेच या परिसरात सर्वत्र रिक्षा फिरवून खरकूत रोगाबाबत जनजागृती करणे.तसेच परिसरामध्ये उद्या पासून मेंढ्यावरील उपचारासाठी ५ आरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्यामुळे प्रत्येक मेंढपाळ धनगर बांधवांनी आपल्या प्रत्येक पशुधनावर्ती उपचार कसा करून घेता येईल यांची आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी व परिसरातील तांड्यावर जाऊन पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ह्या मेंढ्यावरती उपचार करावे अश्या सूचना देण्यात आल्या.
तसेच सर्व धनगर बांधवाना आमदार निलेश लंके साहेब यांनी आधार देत सांगितले की शासन दरबारी सर्वतोपरी पाठपुरावा करून तुम्हा सर्वांना जास्तीत जास्त सर्वोतोपरी मदत मिळून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.
यावेळी उपस्थित पारनेर पंचायत समितीचे मा.सभापती श्री.राहुलभैय्या झावरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री.बाबाजी तरटे,श्री.बबलूशेठ रोहकले,चेअरमन श्री.सुखदेव चितळकर,श्री.दत्ता आवारी,श्री.टकले सर व ढवळपुरी सुतारवाडी परिसरातील सर्व धनगर बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
*पशुवैद्यकीय कॅम्प ठिकाण*
१)सुतारवाडी-डॉ.गाडीलकर
२)वाघवाडी-डॉ.झावरे
३)खारवाडी-डॉ.राठोड
४)लालूंचा तांडा-डॉ.शेळके
५)माळवाडी-डॉ.पवार
संपर्क-१)डॉ.लोखंडे-९२७००८१४५६
२)धोंडिभाऊ टकले-८९७५९८८६५३
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद