पारनेर /प्रतिनिधी
25/02/2020
25/02/2020
पारनेर तालुक्यातील निघोज येथील विद्याधन कोचिंग क्लास येथे क्लासच्या व ग्रामस्थांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची Chemistry या विषयात पीएचडी पदवी प्रदान झाल्याबद्दल डॉ.सुजीत भिकाजी भालेकर व त्यांचे माता पिता यांचा सन्मान करण्यात आला. निघोज ही गुणवंतांची भूमी असून गेली पंधरा वर्षापासून निघोज परिसरचा शैक्षणिक स्तर मोठ्या प्रमाणात उंचावत असल्याचे प्रतिपादन विद्याधनचे संस्थापक व शिवव्याख्याते ज्ञानेश्वर कवाद यांनी व्यक्त केले. यावेळी माजी पोलिस पाटील पांडुरंग पाटील लंके,यांच्या हस्ते सुजीत भालेकर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी दिलीप उनवणे,शिवाजी पिंपरकर,विकास लंके,हौशीराम शेटे,प्रकाश लंके,जावेद इनामदार,माऊली श्रीमंदिलकर,विष्णु लंके, अप्पा लंके,स्वामी समर्थ सहकारी बँकेचे संचालक राजाराम गुंड आदि मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद