पिंपळनेर (पारनेर)/प्रतिनिधी
प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री. संत सदगुरू निष्ठ श्री संत निळोबाराय महाराजांच्या २६७ व्या समाधी सोहळयानिमिताने लाखो भाविकांनी निळोबारायाच्या संजीवनी समाधीचे दर्शन घेतले.संत निळोबाराय महाराज यांच्या समाधी सोहळयानिमिताने सात दिवस नामांकित किर्तनकाराचे कीर्तने झाले.या सोहळ्यात संत तुकाराम महाराज संस्थान देहू कर व तुकाराम महाराज यांचे वंशज तसेच हैबतबाबा फडकरी यांचे वंशज व आळंदी संस्थान चे पदाधिकारी दरवर्षी प्रमाणे तीन दिवस या सोहळ्यात सहभागी झाले होते.
बुधवारी सकाळी दहा वाजता शासकीय महापूजा प्रातधिकारी सुधाकर भोसले यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी पुरोहित म्हणून निळोबाराय महाराज वंशज गोपाळ बुवा मकाशिर यांनी पुरोहित म्हणून काम पाहिले.
![]() |
महापूजा करताना प्रातधिकारी सुधाकर भोसले व पारनेर तहसिलदार ज्योती देवरे व निळोबाराय महाराज देवस्थान ट्रस्ट विश्वस्त (फोटो-सागर आतकर) |
यावेळी पारनेर तहसिलदार ज्योती देवरे,पारनेर पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे,निळोबाराय महाराज देवस्थान ट्रस्ट कार्याध्यक्ष अशोकराव सावंत, सुरेश ज्ञानदेव पठारे ,भाऊसाहेब लटाबंळे,चांगदेव शिर्के,सरपंच शीतल रासकर, उपसरपंच मारुती रासकर,राजेंद्र पठारे उपस्थित होते.
चालू वर्षी वारकरी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील वाफगाव वरुडे येथील सुरेश अर्जुन फंड व विठाबाई सुरेश फंड याना ही महापूजेचा मान मिळाला.तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले की निळोबाराय महाराज हे महाराष्ट्रातील शेवट चे संत म्हणून ओळखले जातात पिंपळनेर येथे येणारे वारकरी हे घरातून निघे पर्यत संसाराची काळजी करतात परंतु जेव्हा या पिंपळनेर नगरीत आल्यानंतर आपले देहभान विसरून निळोबारायांच्या च्या सेवेत एकरुप होतात व चरणी लीन होऊन जातात अशी ही भूमी आहे.महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी असल्याने संतानी नेहमीच समाजाला शांततेचा संदेश दिला असून समाजाला दिशा देण्याचे महान कार्य संतानी केले असल्याने लाखो भाविक येथे येऊन ही एक वेगळीच शांतता दिसून येते, तरी भाविकांच्या सोयीसाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी आठ ते दहा यावेळेत हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांचे किर्तन झाले
दुपारी बारा ते दोन हभप पांडूरंग महाराज घुले यांचे काल्याचे किर्तन झाले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद