पिंपळनेर/प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत निळोबाराय पुण्यतिथी निमित्ताने संत सेना महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व नाभिक मेळावा संपन्न झाला.या निमित्ताने मा. खासदार दिलीपजी गांधी यांच्या निधीतून उभारलेल्या सभामंडपाचे उदघाटन मा.नगरसेवक सुवेंद्र गांधी,हभप भगवताचार्य डॉ.विकासनंदाजी मिसाळ महाराज,महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ,विश्वनाथ कोरडे ,वसंत चेडे आदी मान्यवरांच्या हस्ते 26/02 रोजी पार पडले.दोन दिवस संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ,हरिपाठ तसेच हभप दत्तोबा महाराज राऊत यांचे कीर्तन व खादगाव येथील वाघमारे परिवार व सहकाऱ्यांचा जागर झाला.काल्याचे कीर्तन हभप रमेश महाराज कुलकर्णी यांचे झाले.मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.नाभिक महामंडळाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी शाम जाधव यांची तर प्रसाद भोसले यांची पारनेर तालुका युवा अध्यक्ष म्हणून निवडचे पत्र नाभिक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले.या आपले निमित्ताने नाभिक बांधवांनी योगदान दिले.यावेळी जि.प.सदस्या राणीताई लंके व राहुल शिंदे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
![]() |
सभामंडपाचे उदघाटन करताना मा.नगरसेवक सुवेंद्र गांधी,हभप भगवताचार्य डॉ.विकासनंदाजी मिसाळ महाराज,महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ,विश्वनाथ कोरडे (फोटो-संदीप वाघमारे) |
या कार्यक्रम प्रसंगी शिक्षिका नंदा राऊत,सरपंच शीतल रासकर,भाऊ बिडे,बबन आतकर,मनोहर राऊत,सुनील आतकर, संदीप वाघमारे,दिपक शिंदे,गणेश जाधव,मंगेश काळे,प्रकाश जाधव,मनोहर राऊत,सोन्याबापू जाधव,रवि जाधव,रामेश्वर घायतडक,गणेश खंडागळे,संदीप खंडागळे,गोरक्षनाथ शिंदे,शाम साळुंखे,नाना राऊत, माऊली गायकवाड,मुरली आतकर, प्रमोद सोनवणे, संजय वाघचौरे बाळा पंडीत, गोरख राऊत,सुखदेव राऊत,शिवाजी जाधव,नवनाथ कुटे,कृष्णाजी बडवे, सागर मैड,नवनाथ सालंके,अनिल बोटे,पोपट लोंढे व समस्त नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान मंदिलकर यांनी केले तर सूत्रसंचालन कानिफनाथ गायकवाड यांनी केले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद