प्रत्येकाने चांगले वागण्याचा व चांगल्या मार्गावरून प्रयत्नांची कास धरून वाटचाल करण्याचा व चांगले आचार व विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करा - सुहास शिरपूरकर

0

समुद्रपूर /प्रतिनिधी

स्थानिक रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पुलगाव द्वारा संचालित मुक्ताबाई विद्यालय, समुद्रपूर येथे 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.शरद वांढरे हे होते.तर प्रमुख पाहुणे श्री. प्रशांत पांढरे, श्री.सुहास शिरपूरकर प्रमुख अतिथी जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज चंद्रपूर श्री. चटप सर,झोटिंग मॅडम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.स्वागत गीताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वांढरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. 



प्रत्येकाने चांगले वागण्याचा व चांगल्या मार्गावरून प्रयत्नांची कास धरून वाटचाल करण्याचा व चांगल आचार व विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.तुमच्या प्रयत्नांच्या बळावर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. तुमची शाळा ही सदैव तुमच्यासाठी मार्गदशक ठरेल असे श्री.सुहास शिरपूरकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त झाले.शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी एस आर पूजा कुमारी पूजा बेतवार हिने कार्यक्रमाच्या सुरुवातीला नववीच्या विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील कलाशिक्षक श्री मनोज बाचले यांनी फलक लेखनातून दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी या कार्यक्रमाठी कुमारी पूजा बेतवार, कुमारी कल्याणी येलमुले, कुमार साहिल बारई या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अपेक्षा वासेकर हिने केले.तर आभार प्रदर्शन कुमारी आकांक्षा हिने मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top