कला व सामाजिक क्षेत्रांमध्ये अमूल्य योगदान दिल्याबद्दल मनोज बाचले व अरविंद दहापुते यांचा सन्मान

0

समुद्रपूर /प्रतिनिधी

स्थानीक मुक्ताबाई विद्यालय, समुद्रपूर व संजय गांधी स्मृती विद्या मंदिर,हिंगणघाट येथील कलाशिक्षक श्री.मनोज बाचले, व श्री.अरविंद  दहापुते यांना कला क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल दिल्ली येथे मोदी साहित्य मंच दिल्ली व गांधी शांति प्रतिष्ठान सोसायटी फॉर युथ डेव्हलपमेंट संस्था राष्ट्रीय स्तरावर आधारित विनोबा भावे सन्मान 2019 व महात्मा ज्योतिबा फुले सन्मान 2019 मध्ये कला व सामाजिक क्षेत्रांमध्ये अमूल्य योगदान दिल्याबद्दल मनोज बाचले व शिक्षा क्षेत्रांमध्ये विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त शिक्षकांना खास मानपत्र व सन्मानचिन्ह नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थिती प्रदान करण्यात आला. तसेच संजय गांधी स्मृती विद्या मंदिर ,हिगंणघाट येथील अरविंद दहापुते यांना त्रिलोचन सन्मान नफरवाडी जगन्नाथ दास रत्नाकर सन्मान स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे संस्था डॉक्टर नरेश सागर,निर्देशक प्रजापती,श्री मनोज मिष्रा,पोलिस उपनिरीक्षक खर्जरे मॅडम,किरण शकुंतला उपस्थित होते.या सम्मान सोहळ्यामध्ये नेपाल,काठमांडू,जयपूर,लखनऊ येथून शिक्षक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती उपस्थिती होती. महाराष्ट्रातील वर्धा येथील दोन शिक्षकांनी कला क्षेत्र व सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल मनोज बाचले व अरविंद दहापुते यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता डॉ.सागर देहलवी,इमरान एडवोकेट यांच्या सहकार्याने यशस्वी झाला या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे परिसरात कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top