निघोज/प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील शिरूर,गव्हाणवाडी फाटा,कुरुंद,राळेगण थेरपाळ,जवळा,निघोज या रस्त्याची सध्या दुरावस्था पहायला मिळत आहे.यावरून गाड्या चालवणेही अवघड झाले आहे.यामुळे या रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक अपघातही झाले आहेत.रस्त्याचे काम करत असल्याचा दिखावा म्हणून रस्त्याची डागडुजीही केली जाते.डागडुजी केल्यानंतर दोन ते तीन दिवसातच पुन्हा रस्ता जसा होता तसाच होतो.सबंधित रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु हा निधी खर्च करत असताना काम मात्र नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.रस्त्याचे काम होत असताना एकही अधिकारी कामाकडे फिरकत नाहि अन त्यामुळे ठेकेदार काम खराब प्रतीचे करतात. यातून ठेकेदार व अधिकारी यांच्यात आर्थिक तडजोड होत असल्याची चर्चा जनतेत आहे. यापुढे तालुक्यातील अशा भ्रष्ट अधिकार्यांची माहिती राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु याना देउन कार्यवाही करण्यात येइल.या सबंधित रस्त्याचे काम तातडिने हाती घेउन खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा सर्व गावातील सरपंच व ग्रामस्थांना बरोबर घेउन तीव्र आंदोलन करण्यात येइल.असा इशारा शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे. यासंदर्भात प्रहार पक्ष प्रमुख राज्यमंत्री मा.बच्चूभाऊ कडु,मा.अशोक चव्हाण(सार्वजनिक बांधकाम मंत्री),निलेशजी लंके(आमदार पारनेर),विजयराव औटी(विधानसभा उपाध्यक्ष),सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर,तहसील पारनेर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले.अशी माहिती शिवबा संघटना प्रमुख अनिल शेटे यांनी दिली.
यावेळी निवेदनावर शिवबा संघटना प्रमुख तथा बच्चूभाऊ समर्थक मा.अनिल शेटे, राजु लाळगे,सचिन कोतकर,दत्ता टोणगे,नवनाथ बरशिले,शांताराम पाडळे,सागर गोगाडे,मोहन पवार,नवशाद पठाण,गागरे योगेश,राहुल शेटे,राजु लंके,लहु गागरे,स्वप्नील लामखडे,नवनाथ लामखडे,निलेश वरखडे,जयराम सरडे,सुरज शिरसाट,विश्वास शेटे,गणेश लंके,मच्छिंद्रनाथ लाळगे,शैलेश ढवळे,रोहिदास लामखडे, शंकर वरखडे,वैभव गाडिलकर,खंडु लामखडे,गणेश चौधरी, अंकुश वरखडे,संदिप कवाद,रोहन वरखडे,साई ढवण,राहुल कर्डिले,अविनाश लामखडे,दादाभाऊ रसाळ व प्रहार व शिवबा संघटना कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद