शॉर्टसर्किटमुळे घरातील संसारोपयोगी वस्तू जळून मोठया प्रमाणात नुकसान सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

0
जवळा/प्रतिनिधी
       पारनेर तालुक्यातील जवळा येथे शॉर्टसर्किटमुळे घरातील संसारोपयोगी वस्तू जळून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.अचानक वाढलेल्या विद्युत प्रवाहाने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी पेट घेतला यामुळे प्रवीण नामदेव बरशिले यांच्या घरातील संसारपयोगी वस्तू तसेच घरातील महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्या.


     नेहमीप्रमाणे कामावरुन आल्यानंतर घराशेजारील गोठ्यात  प्रवीण बरशिले हे साफसफाई करत होते.अचानक वाढलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे घरातील फ्रीज ने पेट घेतला व मोठा आवाज होऊन फ्रिज चा दरवाजा घराबाहेर पडला त्यामुळे घराकडे धाव घेत प्रथम घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढला नाही तर मोठा अनर्थ घडला असता आम्ही घराबाहेर असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही,अशी माहिती प्रवीण बरशिले यांनी दिली.

रविवार दिनांक 8 मार्च 2020 रोजी जवळे येथील का कामगार तलाठी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला असून सदर अहवाल पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे सादर करणार आहे,अशी माहिती जवळे कामगार तलाठी आकाश जोशी यांनी  दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top