मुलिकादेवी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला

0
निघोज / प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
      तरुणांनी आपल्या बुद्धिचा वापर चांगला केला तर देशाला उज्वल भविष्य आहे. हेच तरूण देशाचे आधारस्तंभ आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ध्येय,कष्ट करून पुढे गेले तर जिवनात तेजोमय सुर्य उगवल्याशिवाय राहणार नाही. देशाला गरज कशाची आहे व आजच्या युवकासमोर काय आव्हाने आहेत याचा विचार केला पाहिजे. सोशल मिडियाचा अतिरेकी वापर कमी झाला तर गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल .त्यामुळे भविष्याची चिंता करा. ज्ञानाचे वाटप करून विद्यार्थ्यांना जागृत होण्याचा सल्ला यावेळी गवळी यांनी दिला. निघोज येथील मुलिकादेवी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी पारनेरचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी बोलत होते.


डॉ. सहदेव आहेर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये कुवत असुन ती कुवत व स्वतामधील परीस ओळखता आला तर भविष्यकाळ उज्वल आहे.महाविद्यालय हे संस्काराचे केंद्र असून मुलिकादेवी महाविद्यालय हे उपक्रमशील महाविद्यालय आहे.विद्यार्थ्यांनी समाजासाठी, देशासाठी मोठे व्हावे व मोठे कार्य करावे असे आव्हान केले.
मुलिकादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुपेकर सर यांनी महाविद्यालय म्हणजे विद्यार्थांना मिळणाऱ्या संस्काराचा पाया आहे असे सांगितले. यावेळी डॉ.मनोहर एरंडे, प्रा.राम खोडदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.तसेच कविता रसाळ, शुभांगी डोमे, प्रदिप सुरकुंडे, श्रद्धा घोडे, कोमल पवार, दिपक लाळगे, श्रद्धा ढवण, निशा पानमंद, वैभव घोगरे, अजित सोदक, सुभाष घोडे, पुजा लंके, श्रीकांत रसाळ या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पी.एच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयातील प्रा.डॉ. मनोहर एरंडे व डॉ. पोपट पठारे यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


      या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग अधिकारी प्रा. प्रविण जाधव वार्षिक पारितोषिक वितरण कार्याध्यक्षा प्रा. प्रतिभा शेळके, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे, प्रा. शामराव रोकडे, डॉ. पोपट पठारे, डॉ.गोविंद देशमुख, प्रा.सचिन निघुट, प्रा.विशाल रोकडे, प्रा.राम खोडदे, प्रा.अशोक कवडे, प्रा.अक्षय अडसुळ, प्रा.स्वाती मोरे, प्रा. शहाजी पांढरे, प्रा.सचिन लंके, प्रा.सोनाली बेलोटे, प्रा.पोपट सुंबरे, प्रा.निलिमा घुले, प्रा.संगिता मांडगे, प्रा.सुरेश गाडिलकर, प्रा.अंजली मेहेर, प्रा.दिपाली जगदाळे, प्रा.प्रतिभा शेळके, प्रा.अनुजा भांबरे, प्रा.राणी ढगे, प्रा.जनाबाई घेमुड, केशर झावरे, प्रा. विशाल चव्हाण, प्रा. प्रीती कार्ले, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ घोगरे, संदिप लंके, दिघेश पवार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रतिभा शेळके यांनी यांनी केले तर आभार प्रा. प्रविण जाधव यांनी  मांडले.सुञसंचालन प्रा.मनिषा गाडिलकर व प्रा. आनंद पाटेकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top