कोरोनाचा प्रादुर्भाव: भव्य कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम करावा लागला रद्द

0
निघोज /प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या प्रसारला आळा घालण्यासाठी प्रत्तेक स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून नगर शहरतही कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यामुळे या कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी प्रत्तेक व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे. असाच एक निर्णय पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा मिल्क अँड अग्रो प्रोडक्टस कंपनीने घेतला आहे. दरवर्षी मळगंगा मिल्क अँड अग्रो प्रोडक्टस कंपनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करत असते. व मोठ्या प्रमाणात अन्नदान करत असते. यावेळी १८ ते २५ मार्च दरम्यान या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी निघोज पचक्रोशीतील हजारो लोक कीर्तन महोत्सवात कीर्तनरूपी ज्ञान ऐकण्यासाठी येत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट उभे असल्याने यावर्षीच्या कीर्तन महोत्सवाच्या परंपरेला खंडित केले आहे. अशी माहिती कन्हैय्या दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष मच्छिंद्र लंके यांनी दिली.
प्रतिकात्मक

आजच्या विज्ञान व धकाधकीच्या गतिमान जीवनात केवळ संत-संगती व नामस्मरन हेच अंतिम समाधान देईल या उदेशाने श्री. स्वामी समर्थ सहकारी बँकेचे उपाध्यक्ष शांताराम लंके, महानगर बँकेचे संचालक बबन लंके व कन्हैय्या दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष मच्छिंद्र लंके या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करत असतात. परंतु कोरोना व्हायरसच्या संदर्भात खबरदारी म्हणून यावर्षीचा मळगंगा मिल्क अँड अग्रो प्रोडक्टस कंपनीच्या २३ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रमानिमित्ताने ठेवलेला भव्य कीर्तन महोत्सव यावेळी रद्द केला आहे. या निर्णयाचे निघोज पंचक्रोशीतील नागरिकांनी स्वागतच केले आहे. कोरोना व्हायरसच्या साथीला धैर्याने तोंड देवू व ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे,असे आव्हाहनही यावेळी त्यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top