लॉकडाऊनमुळे नाभिक समाज आर्थिक अडचणीत..सरकारने नाभिक बांधवांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची पारनेर तालुका नाभिक संघटनेची मागणी

1
पारनेर : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. या लॉकडाऊनला सर्वांनी प्रतिसाद देत कोरोना बरोबरच्या लढाईत आपले योगदान दिले.  
कोरोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्ती काळजी घेत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ३० दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे व्यवसायही बंद आहेत.त्यामुळे हातावरील पोट असलेल्या व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाभिक समाजाने ही या लॉकडाउन काळात आपली दुकाने बंद करून कोरोनाशी लढा देत आहेत.

नाभिक समाजाची परिस्थिती ही अत्यंत प्रतिकूल असून सध्या व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाज हा आर्थिक अडचनीत सापडला आहे. समाजावर उपासमारीची वेळ येऊनही तो सर्व शक्तीनिशी शासनास सर्वतोपरी सहकार्य करत आहे.उच्च पदस्थ व्यक्ती दडपण आणत, धाक दाखवून शेतात फार्म हाऊसवर, घरी किंवा अन्य ठिकाणी बोलावून दाढी-कटिंग करण्यासाठी दबाव आणत आहेत. यामुळे कायद्याचे उल्लंघन केले म्हणून विविध ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये नाभिक समाजातील व्यक्तींवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे समाजातील लोकांवर हा अन्याय होत असून धनदांडगे मात्र मोकाट आहेत. त्यामुळे कारागिरास कामासाठी बोलावणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हे नोंदविण्यात यावेत अशी मागणी पारनेर तालुका नाभिक संघटनेने तहसीलला पत्र देऊन केली आहे.
महाराष्ट्रात नाभिक सलून व्यवसाईकांची संख्या ही ३० लाखांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर सलून मध्ये लोकांची गर्दी ही जास्त असणार आहे.नंतर च्या काळात सलून व्यावसायिकाच्या आरोग्याचा त्याच बरोबर गिऱ्हाईकांच्या आरोग्याचा प्रश्न ही  उद्भवू शकतो यासाठी संपूर्ण नाभिक सलून व्यावसायिकांसाठी वैद्यकीय सेवेत देण्यात येणारे सुरक्षा किट,चष्मा,हॅन्डग्लोज,ड्रेस इत्यादी साहित्य पुरविण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. घर, दुकानभाडे, कर्जावरील हप्ते व त्यावरील व्याज माफ करावे. समाजातील व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून पाच हजार महिना पॅकेज जाहीर करून संसर्ग नसलेल्या ऑरेंज व ग्रीन झोन मधील जिल्ह्यांमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. कोरोनाच्या विषाणूला हरवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. सरकारने दिलेल्या नियमाचे पालन आम्ही करत आहोत करत राहू. आपण नाभिक समाजास नक्की न्याय द्याल अशी अशाही या निवेदनात पारनेर तालुका नाभिक संघटने व्यक्त केली.यावेळी अहमदनगर जिल्हा नाभिक महामंडळ उपाध्यक्ष शामराव जाधव, तालुका नाभिक संघटना अध्यक्ष-भाऊ बिडे, संघटनेचे उपाध्यक्ष शाम साळुंके, सचिव विनायक कुटे, सह-सचिव सुनील आतकर, विजू कार्ले, स्वप्निल बिडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

Google Ads 2




 

To Top