अहमदनगर जिल्ह्यात आणखी २ कोरोनाबाधित ; एकूण कोरोना बाधीतांची संख्या ३१ वर

0
अहमदनगर:-जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून  हे दोन्ही बाधीत काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या रुग्णाची मुले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. त्यामुळे कोरोना बाधीत रुग्णाची संख्या आता ३१ झाली आहे. याशिवाय मूळच्या श्रीरामपूर तालुक्यातील एका बाधीत व्यक्तीचा पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. आज आलेल्या अहवालांपैकी ५ जणांचे १४ दिवसानंतरचे अहवाल हे निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एका ७६ वर्षीय व्यक्तीचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना संस्थात्मक आणि रूग्णालय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या आता १८ झाली आहे. सध्या बूथ हॉस्पीटल मध्ये ११ जण उपचार घेत आहेत.

     जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याचा व्यक्तीचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आलेल्या अहवालानुसार २९ आणि ३५ वर्षीय मुलेही बाधीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार आता कोरोना बाधीत रुग्णाची संख्या ३१ झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एका बाधीत व्यक्तीचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. दरम्यान, १२ रुग्णांना यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच मुकुंदनगर येथील ७६ वर्षीय बाधीत रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन रूग्णालय त्या व्यक्तीला देखरेखीखाली ठेवणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top