निघोज सह चासकरवाडी वडनेर बु येथे "चला चुल पेटवु" उपक्रमाअंतर्गत गरजुना मदतीचा हात.

0
निघोज :- संपूर्ण जगभर कोरोना सारख्या महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन असल्या कारणाने गोर-गरीब गरजू व्यक्तींच्या हाताला रोजगार नाही.रोजगार नसल्याने सध्या या लोकांना स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या पोटाची भूक भागवणे हे गरजेचे झाले आहे. यासाठी सध्या तालुक्यातील दानशूर व्यक्ती मदतीचा हात पुढे करत आहेत. 

पारनेर तालुक्यात गेल्या १५ दिवसापासून शिवबा संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू व्यक्तींना एक हात मदतीचा "चला चूल पेटवू" या उपक्रमांतर्गत धान्य व भाजीपाला घरपोहोच करण्याचे काम डॉ.भास्कर शिरोळे, शिवबा संघटना, प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व सहकारी करत आहेत. चासकरवाडी येथे भाजीपाला देऊन व गरजु कुटुंबाना मदत करण्यात आली. त्याचप्रमाणे  वडनेर बु व निघोज येथील गरजु कुटुंबाना देखील यांच्या माध्यमातून मदत देण्यात आली. यावेळी शिवबा संघटनेचे मार्गदर्शक राजेंद्र वाळुंज ,वडनेर बु. चे सरपंच स्वाती नर्हे,शरद वरखडे,रोहन वरखडे उपस्थित होते. ज्यांना रेशनचे धान्य मिळत नसेल त्यांनी डॉ.भास्कर शिराळे, अनिल शेटे, प्रितेश पानमंद, नवनाथ बरशिले, गणेश चौधरी, नवशाद पठाण, दत्ता टोणगे, सचिन कोतकर, शांताराम पाडळे, योगेश गागरे, सागर गोगडे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन अनिल शेटे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top