रेशन धान्य वितरण बाबत तहसीलदार पारनेर यांचे वतीने आवाहन

2
पारनेर : शासनामार्फत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सध्याच्या ई-पॉस मशिनवर कार्यरत असलेल्या अंत्योदय कुटूंब लाभार्थी यांना प्रतिकार्ड 26 किलो गहू व 9 किलो तांदूळ असे एकूण 35 किलो धान्य देणेत येणार आहे. तसेच  प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ देणेत येणार आहे. सदर दोन्ही योजनेसाठी पात्र लाभार्थी यांना गहू 2 रुपये किलो व तांदूळ 3 रुपये किलो असा दर राहील. तसेच अंत्योदय कार्ड धारकांना 1 किलो साखर रु 20 प्रमाणे, तर 1 किलो डाळ रु 45 प्रमाणे देय राहील

    नियमित धान्या व्यतिरिक्त एप्रिल, मे व जून 2020 साठी प्रत्येक महिन्यात सदर दोन्ही योजनेतील अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. 

      तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‍दिनांक 09 एप्रिल 2020 रोजी शासन निर्णय नुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत समाविष्ट न झालेल्या, रु.1 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या एपीएल (केशरी)‍ शिधापत्रिका धारकांना माहे मे व जून 2020 या दोन महिन्यासाठी प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ सवलतीच्या दराने देणेत येणार आहे. शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा शिधापत्रिकांचे आधार सिडींग झाले नसेल तरीही केशरी कार्ड लाभार्थ्यांना गहू 8 रुपये किलो व तांदूळ 12 रुपये किलो या सवलतीच्या दराने देणेत येईल. 

      नियमित मोफत तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करताना ग्राहकाला पावती देणे रास्तभाव दुकानदारांना अनिवार्य आहे. सबंधित लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रास्तभाव दूकानामध्ये गर्दी न करता प्रत्येक ग्राहकाच्या मध्ये 1 मीटर अंतर ठेवून तोंडाला मास्क लावावे तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन धान्याची उचल करावी. असे तहसीलदार पारनेर यांचे वतीने आवाहन करण्यात येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

2टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

Google Ads 2




 

To Top