मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ५ वाजता पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ५ वाजता पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आहे.
लॉकडाऊनबद्दल त्यांनी काही घोषणा केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ५ वाजता पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आहे.आहे. सर्वांनी शिस्त पाळली तरच कोरोनाची साखळी नक्की तुटेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

एका विषाणूने आमच्या सर्वांच्या तोंडावर पट्ट्या बांधल्या आहेत. एवढी हिंमत कुणातच नव्हती. पंतप्रधानांनीही तोंडावर मास्क लावला होता. कोरोनाच्या या संकटात
सगळी राज्य सरकार व केंद्र सरकार सोबत आहोत. राजकारण हे पाचवीला पुजलेय पण आता यात मला राजकारण नकोय. या संकटाच्या काळात पक्षीय राजकारण थांबली पाहिजे !
सध्या मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या. त्यांच्यात १ हजार पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण असले तरी त्यातील ६५ टक्के रुग्णात सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नका, अगदी गरज असेल तरच घराबाहेर पडा !

*महाराष्ट्र धीरोदत्त, देशाला दिशा दाखवणारा*
आतापर्यंत महाराष्ट्राने धीरोदत्तपणे या संकटाशी सामना केला आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवतो या संकटातही माहाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांना गडबडून, गोंधळून न जाण्याची विनंती केली. ही बंदी किती दिवस हे आपल्याच हातात असल्याचे सांगतांना शिस्त व्यवस्थित पाळली तर विषाणुची साखळी तुटेल याची जाणीव ही त्यांनी करून दिली. संपूर्ण देश एकासंघपणे या विषाणुशी लढतोय, यात कोणतेही राजकारण करायचे नाही हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ही एकजुट सदासर्वदा अशीच कायम ठेवली तर महाराष्ट्र देश कोरोनाच्या संकटावर नक्कीच मात करील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
...

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top