उद्धव ठाकरे लॉकडाऊन उठवणार की नाही याबद्दल आज 5 वाजता साधणार जनतेशी संवाद

0
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 5 वाजता पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. लॉकडाऊनबद्दल ते काही घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवा अशी मागणी केली होती. तशीच मागणी अनेक मुख्यमंत्र्यांनीही केली होती. त्यानंतर काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यांमध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहिल अशी घोषणाही केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेेनार याकडे सर्व्वांचेे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लॉकडाऊन पुढे 30 एप्रिलपर्यंत वाढवावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने लॉकडाऊन उठवण्याची चिंता व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसमवेत चिंता व्यक्त केली. यावर आवर घालण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत वाढावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसचा देशात वेगानं वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी आज पुन्हा मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. मात्र राज्यातील स्थितीवरही प्रत्येक राज्य पंतप्रधानांसोबत चर्चा करून निर्णय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top