प्रतिनिधी / पारनेर
पारनेर तालुक्यातील निघोज येथील ४ रुग्णांना अहमदनगर येथे तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.अहमदनगर येथे दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची तपासणी करून त्यांचे नमुने तात्काळ पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
आज सकाळी त्या ४ ही रुग्णांचे रिपोर्ट मिळाले असून सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे तहसीलदार ज्योती देवरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लाळगे यांनी सांगितले आहे.
यामुळे निघोज परिसरासह तालुक्यातील जनतेच्या मनावरील आलेले दडपण दूर झाले असून यापुढे सर्वांनी काळजी घेऊन घरातच राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Tumchya batmya hya mudde sud astat tyamule vachayala hi changle vatate
उत्तर द्याहटवा