प्रतिनिधी / पारनेर
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील तीन जणांना पारनेर पोलिसांनी अटक केली.व्हाट्स अप च्या माध्यमातून कोरोना व्हायरस बद्दल खोटी अफवा पसरावल्याने ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर वृत्त
सोशल मीडियातून कोरोना बद्दल खोटी माहिती पसरावल्याच्या आरोपावरून नांदूर पठार व पिंपळगाव रोठा येथील व्हाट्स अँपच्या ग्रुप अडमिन सह तीन जणांना पारनेर पोलिसांनी अटक केली आहे.हवालदार भालचंद्र दिवटे यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला.
'' कोरोनाची लागण झालेली एक व्यक्ती गारगुंडी, अक्कलवाडी, वडगाव दर्या,पिंपळगाव रोठा परिसरात फिरत आहे.तो जवळ येऊन बोलतो मला पाणी द्या किंवा आजची रात्र तुमच्याकडे मुक्काम करू द्या असे म्हणतो.अंगावर थुंकतो तरी सतर्क राहा '' असा मेसेज नांदूर पठार येथील दत्ता भाऊ फ्रेंड सर्कल या व्हाट्स अँप ग्रुपवर रविवार दिनांक ५ ला टाकण्यात आला होता.त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरविल्याबद्दल तसेच अफवा पसरविल्याबद्दल हा मेसेज टाकणारा मनोज जगताप (रा.पिंपळगाव रोठा),किरण बोटे व ग्रुप अडमीन दत्तात्रय आंग्रे (दोघे रा.नांदूर पठार)यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करून अटक केली आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद