शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील ३ महिने ५ रूपये दरात शिवभोजन देण्याचा निर्णय

0
मुंबई- 
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक गरजू व्यक्तींना त्यामध्ये मजूर,स्थलांतरित,बेघर,तसेच बाहेर गावांकडून आलेले विद्यार्थी यांना जेवणाचा प्रश्न भेडसावत असताना आता नागरिकांना शिवभोजन योजनेचा लाभ घेता येणार आहे.शिवभोजन योजना आता तालुकास्तरावर करून पुढील ३ महिने शिवभोजन थाळी आता ५ रुपयांमध्ये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मंत्रीमंडळाची ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली.


१४ एप्रिल नंतर लॉकडाउन उठविण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तर परराज्यातील मजूर,कामगार,स्थलांतरित अशा साडेपाच लाख लोकांना दररोज सकाळी नाश्ता,दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यात येत आहे.
- उद्धव ठाकरे ( मुख्यमंत्री )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top