पारनेर तालुका जैन समाज संघटनेचा उपक्रम

0
प्रतिनिधी / निघोज
     पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयात निवासी असलेल्या मराठवाडा व विदर्भ येथील तीस शेतमजूर कुटुंबांना पारनेर तालुका जैन समाज संघटनेने संसारोपयोगी भांड्याचे सेट दिले. याप्रसंगी तहसीलदार ज्योती देवरे व जैन समाजाचे तालुका संघटना पदाधिकारी व सदस्य  उपस्थित होते. भगवान महावीर जयंती निमित्ताने कोरोना पार्श्वभूमीवर जयंती उत्सव साजरा न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय जैन समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष कुंदनकाका साखला यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला.

        त्यानुसार निघोज येथील कुटुंबांना भांडे वाटप रविवार दि. ५ एप्रिल रोजी करण्यात आले. या कुटुंबांना पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी मोठय़ा प्रमाणात शिधा दिला. मात्र त्या शेतमजूर कुटुंबातील सदस्यांकडे स्वयंपाक करण्यासाठी भांडे उपलब्ध नाहीत याची माहिती जैन समाजाचे तालुका अध्यक्ष साखला व त्यांच्या सहकाऱ्यांना समजल्याने त्यांनी तातडीने त्यांना भांडी उपलब्ध करुन दिली. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, बाजार समितीचे संचालक व जैन समाज संघटनेचे पदाधिकारी राजेश भंडारी, जैन काॅस्फंरस न्यू दिल्ली राष्ट्रीय युवाअध्यक्ष सागर साखला, अळकुटी येथील प्रसिद्ध व्यवसायीक सचिन साखला, परेश कटारिया, संतोष कटारिया, जैन संघटनेचे निघोज शहराध्यक्ष प्रदीप गांधी, आळकुटी येथील मामाजी कॉर्नर या दुकानचे संचालक मयुर पगारिया, सुमती फिरोदिया, प्रमोद लोढा आदी उपस्थित होते. यावेळी गर्दी न करता तसेच सॅनिटायझरचा व मास्कचा वापर करीत तसेच ठरावीक अंतर ठेउन हे भांड्याचे सेट वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. पारनेर तालुका जैन समाज संघटनेच्या या उपक्रमचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top